एकटी असल्याचा फायदा घेत तरूणीचा हात पकडून विनयभंग

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा गावातील एका भागात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी दुपारी दीड वाजता सावदा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, सावदा गावात १९ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान सोमवारी २४ जून रोजी सकाळी ११ वाजता तरुणी घरात एकटी असतांना असताना गावात राहणारा शकील शब्बीर मोहम्मद वय-३८ हा तिच्या घरात घुसला व तिला हात पकडून तिच्यासोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर पीडित तरुणाने नातेवाईकांना सांगितले. त्यानुसार त्यांनी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पीडित तरुणांनी दिलेल्या फिर्यादीवरून शकील शब्बीर मोहम्मद याच्या विरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ उमेश पाटील करीत आहे

Protected Content