चाळीसगाव (प्रतिनिधी) महाविद्यालयात शिकत असताना आपण अनेक बक्षिसे घेऊ, पुढे अनेक मोठ्या पदांवर नोकरीस लागू परंतु आपण आपल्या मातीला व महाविद्यालयाला कधीही विसरू नका, खान्देशच्या मातीतील अनेक विद्यार्थी हे भारताच्या अनेक क्षेत्रामध्ये नोकरी करताना दिसतात तसेच आपल्या आयुष्यात चांगल्या लोकांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे आणि त्याच वाटेने पुढे गेलो पाहिजे, असे प्रतिपादन चाळीसगाव महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभा प्रसंगी जळगाव येथील सहसंचालक डॉ. प्रशांत मगर यांनी केले.
बी.पी आर्टस् एस.एम ए सायन्स के के सि कॉमर्स कॉलेज आणि के आर कोतकर जुनिअर कॉलेज मध्ये नुकतेच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायणभाऊ अग्रवाल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील सहसंचालक डॉ. प्रशांत मगर होते व्यासपीठावर उपाध्यक्ष मिलिंद देशमुख , सचिव डॉ विनोद कोतकर , वरिष्ठ महाविद्यलयाचे चेअरमन डॉ एम. बी पाटील, अॅड. प्रदीप अहिरराव,क मा राजपूत ,डॉ सुनील राजपूत प्राचार्य मिलिंद बिल्दीकर, प्रा आर आर बोरसे उपस्थित होते सुरवातीला स्वागतपर प्रस्थाविक करताना प्राचार्य मिलिंद बिल्दीकर म्हणाले कि, वर्षभरामध्ये शैक्षणिक ,क्रीडा कला एन एस एस,एन सी सी ,व वादविवाद वक्तृत्व स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाते एकूण ३५० विद्यार्थ्यांना या वर्षी बक्षिसे देण्यात आली.
डॉ प्रशांत मगर यांनी या समारंभासाठी डॉ धनराज माने शिक्षण संचालक,उच्च व तंत्र शिक्षण पुणे , यांनी पाठविलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन करून म्हणाले किम हाविद्यालयात शिकत असताना आपण अनेक बक्षिसे घेऊ पुढे अनेक मोठ्या पदांवर नोकरीस लागू परंतु आपण आपल्या मातीला व महाविद्यालयाला कधीही विसरू नका, त्याचे उदाहरण म्हणजे तुमच्या मातीतील विजय चौधरी हे आहेत खान्देशच्या मातीतील अनेक विद्यार्थी हे भारताच्या अनेक क्षेत्रा मध्ये नोकरी करताना दिसतात. शेवटी अध्यक्षीय मनोगतात नारायणभाऊ म्हणाले कि,आयुष्यात यश अपयश पचवण्याची ताकद फक्त खेळाडूंमध्येच असते ,माणसाने अपयशाने कधी हि खचून जायचे नसते आणि बक्षीस घेण्यासाठी आपण प्रचंड मेहनत केली पाहिजे तरच आयुष्यात आपण काहीतरी करू शकतो . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ गंगापूरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार पर. आर आर बोरसे यांनी मानले