जळगाव प्रतिनिधी । ठेविदार हितरक्षण व भ्रष्टाचार निर्मूलन समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून भ्रष्ट अधिकार्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली.
पतपेढी संचालक, कर्जदार व अधिकार्यांनी संगनमत करून ठेविदारांना लुटले असल्याची तीव्र भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे. बीएचआर पतसंस्थेचे अवसायक कंडारे हे गत चार वर्षांपासून लेखापरिक्षण करण्यास टाळाटाळ करत आहेत. याशिवाय, कर्जदारांकडून कर्ज वसूल करण्यालादेखील अधिकारी प्राधान्य देत नसल्याचा गंभीर आरोप ठेविदारांनी केला आहे. याच प्रकारे आसोदा ग्रामीणसह अन्य पतपेढ्यांमध्येही याच प्रकारचा घोळ होत आहे. यामुळे सहकार खात्याच्या नाशिक आणि जळगाव येथील अधिकार्यांची हकालपट्टी करण्याची मागणी ठेविदारांनी केली आहे.
पहा : ठेविदारांच्या नेमक्या काय मागण्या आहेत ते !