जनहितांच्या कामात अडथळा आणणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा – आ. चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरात आज २३ जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालय येथे “जलजीवन मिशन हर-घर नल पाणी पुरवठा” योजनेसंदर्भात आढावा बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यांनी मतदारसंघातील मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यातील जलजिवन मिशनच्या कामाचा आढावा, गावातील किती कामे पूर्णत्वास आली तसेच काही कामे संबंधित ठेकेदार करत नसल्याने ती कामे अपूर्ण आहे.

 

या संदर्भात अशा ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर जनहिताच्या कामांमध्ये दिरंगाई केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यांच्या सुचना यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार चंद्रकांत पाटलांनी केल्या. तसेच मतदारसंघातील जलजीवन मिशन अंतर्गत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात प्रशासकीय अधिकारी यांना सूचना त्यांनी केल्या. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकितजी,कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा भोगावले, उपकार्यकारी अधिकारी लोखंडे, मतदारसंघातील गावातील सरपंच, ग्रामसेवक, बांधकाम अधिकारी आणि शिवसेना-युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content