टाकळी ता.चाळीसगाव । जळगाव लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी तालुक्यातील टाकळी गावातील पदाधिकारी, ग्रामस्थांशी व युवावर्गाशी सवांद साधला. यानंतर गावातील चौकातील मोठया वृक्षाच्या सावलीतच ग्रामंस्था सोबत बैठक घेत विकासासाठी राष्ट्रवादी आघाडीला सहकार्य करण्याचे आवाहन केले. संधी दिल्यास शेतीसाठी सिंचनासह तालुक्यातील उद्योगिक विकासाला गती देण्यात येईल. यावर सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे अश्वासन दिले.
माजी आमदार देशमुख यांनी केले मार्गदर्शन
माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी देखिल मनोगत व्यक्त करत परिवर्तनाचे आवाहन केले. यावेळी पंडीतराव मगर, हिम्मतराव सुर्यवंशी, भास्कर ताथ्या पवार, गंगाधर पवार, विकास देवरे, रावसाहेब पवार यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवंर व ग्रामस्थांनी गावातून अधिक प्रतिसाद मिळणार असल्याचे अश्वासन दिले. सोबत पक्षाचे जिल्हा कार्यध्यक्ष विलास पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष श्याम देशमुख, महानंदाचे संचालक प्रमोद बापू पाटील, जिल्हा परिषद गटनेते शशिभाऊ साळुंखे, जि.प. सदस्य भूषण पाटील डॉ.शहाजीराव देशमुख मंगेश बापू पाटील, भगवान बापू पाटील, रामचंद्र जाधव, मिलिंद जाधव, कॉग्रेसचे नेते अशोक खलाणे, अनिल निकम, योगेश पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.