चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे हे दर तात्काळ कमी करण्यात यावे, शिवसेना पक्षांकडून मोदी सरकारच्या निषेधार्थ शहरातील सिग्नल चौकात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
कोरोनाच्या काळात उत्पन्नाचे स्त्रोत ठप्प झाल्यामुळे अनेक जणांचे जगणेच असाह्य झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट कुठेतरी ओसरत असताना व परिस्थिती पूर्वपदावर येत असताना केंद्र सरकारने अचानक पेट्रोल, डिझेल, व गॅस सिलिंडरच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ केलेली आहे. त्यामुळे हे दर कमी करण्यात यावे म्हणून शिवसेनेकडून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून चाळीसगाव शहरातील सिग्नल चौकात मोदी सरकारच्या निषेधार्थ शिवसेना पक्षांकडून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्करराव जाधव यांच्याशी विरोधी बाकांवरील सदस्यांनी गदारोळ घालत उपाध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या बारा आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे अध्यक्षांसोबत केलेल्या गैरवर्तन व शिवीगाळ बाबत शिवसेनेकडून जाहीर निषेध नोंदविण्यात आले.
यावेळी “वाहे मोदी तेरा खेल’ सस्ती दारू महेंगा तेल, पेट्रोल डिझेलचे दरवाढ कमी झालेच पाहिजे अशा विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. तालुका प्रमूख रमेश बाबा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले होते.
याप्रसंगी शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, तालुका प्रमूख रमेश बाबा चव्हाण, शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, तालुका संघटक सुनील गायकवाड, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, माजी तालुकाप्रमुख धर्मा काळे, माजी नगरसेवक संजय ठाकरे, प्रभाकर उगले, उप तालुका प्रमुख हिम्मत निकम, तुकाराम पाटील, दिलीप पाटील, शिरसगावचे दिलीप पाटील, गणेशपुरे रघुनाथ कोळी, अनिल पाटील, संजय संतोष पाटील, मुराद पटेल, बैरागी विलास भोई, रामेश्वर चौधरी, महेंद्र परदेशी, देवेंद्र साबळे, अनिल कुटे, संतोष गायकवाड, गणेश पवार, सुनील महाले, सोमनाथ साळुंखे, सुभाष राठोड, नंदू गायकवाड, दिलीप राठोड,
वाशिम चेअरमन जावेद शेख, चेतन कुमावत जावेद शेख, निलेश गायके, जितेंद्र बोदडे, रॉकी धामणे गणेश पवार, भूषण चव्हाण, शेख बापू नवले, आशिष सानप, भाऊ लाल पाटील , आबासाहेब पाटील, कैलास वाघ, सागर रघुनाथ पाटील, भाऊसाहेब रावते, अनिल राठोड, मच्छिंद्र राठोड, दिलीप खलाणे, रोशन महाडिक, दीपक काकडे , सचिन पाटील, योगेश पाटील, गोपाल पाटील, राजेश पाटील, व मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.