चाळीसगाव प्रतिनिधी । भाजपाच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर चाळीसगावात भाजपातर्फे महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा सिग्नल चौकातून काढण्यात आली.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्षाचे १२ आमदारांना निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षांकडून राज्यभरात आघाडी सरकारची प्रतिकात्म अंत्ययात्रा काढण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून चाळीसगावात भाजपातर्फे महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्म अंत्ययात्रा शहरातील सिग्नल चौकातून रात्री ८ वाजताच्या सुमारास काढण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील निकम यांच्या नेतृत्वाखाली हि अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक बापू अहिरे, अॅड. प्रशांत पालवे, सरचिटणीस अमोल नांदकर, पंचायत समिती सदस्य संजय पाटील, अमोल चव्हाण, सदानंद चौधरी व सुभाष पहेलवान आदी उपस्थित होते.