यावल (प्रतिनिधी) । तालुक्यातील अंजाळे शिवारात तापी नदीतील डोहामध्ये 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील अंजाळ शिवारातुने गावा जवळून वाहत असलेल्या तापी नदी पात्रातील डोहात शिवराम रतन भिलाला (वय-20) या तरुणाचा 25 जून रोजी सकाळी 11 वाजेच्या पुर्वी बुडून मृत्यु असुन त्याचा मृतदेह आढळुन आला आहे. धनराज शांताराम सपकाळे यांनी खबरीवरून यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत यावल पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास स.फौ. नागपाल भास्कर हे करीत आहेत.