जळगाव प्रतिनिधी । एकीकडे 40 ते 42 अंश तापलेला सूर्य आग ओकत असतांना आजच्या सायंकाळी मात्र जळगावकरांना पुण्यातील परिवारसंस्थे निर्मित ‘स्वरस्वप्न’ या संगीतमय कार्यक्रमात व्हायोलिनच्या सुरात न्हावून निघाल्यामुळे सुखद ठरली.
डॉ.राम आपटे प्रतिष्ठान व कै.रामलालजी चौबे मेमोरिअल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील परिवार संस्थेने 14 व्हायोलिन वादक, दोन तबला , एक मृदुंग असे 17 ते 18 वादक घेवून शास्त्रीय रागावर आधारीत व्हायोलीन वरील गीतांनी जळगावकरांना चिंब भिजवले. त्यात तबला व व्हायोलिन जगुलबंदी, मृदंग व व्हायोलिनची जुगलबंदी पाहायला मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्ना दातार यांनी केले. राम आपटे प्रतिष्ठानतर्फे राजन भावसार, प्रा. शुभदा कुलकर्णी, प्रा.चारुदत्त गोखले, सचिन गाडगीळ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.