चाळीसगाव (प्रतिनिधी) शेठ ना.बं. वाचनालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे ग.दि. माडगुळकर, पु.ल. देशपांडे, सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेल्या व औरंगाबाद येथील गायक देवदत्त देशपांडे, गौरी नरसापूर व निवेदिका अर्चना नरसापूर यांनी गायलेल्या मराठी गाण्यांची सुश्राव्य मैफिल ‘स्वर आले जुळुनी’ रविवारी (दि.२३) सायंकाळी ६.०० वाजता शेठ ना.बं. वाचनालयात संपन्न झाली.
यावेळी सर्व कलाकारांचे वाचनालयाच्या अध्यक्षा डॉ. हेमांगी पूर्णपात्रे व सांस्कृतिक समिती निमंत्रक डॉ. मुकुंद करंबेळकर यांनी त्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संचालक विश्वास देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाला श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला. यावेळी वाचनालयाचे जेष्ठ संचालक बाबासाहेब चंद्रात्रे, प्रा.ल.वि. पाठक, राजेंद्र चिमणपुरे, प्रकाश कुलकर्णी, मनीष शाह, राजेश ठोंबरे, सुबोध मुंदडा, प्रा.सौ. मालती निकम, प्रा.मधुकर कासार, मिलिंद देव, ग्रंथपाल धुमाळ उपस्थित होते. आभार प्रदर्शन प्रा. दीपक शुक्ल यांनी केले. कार्यक्रमासाठी कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.