अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालनुक्यातील मारवड येथील कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील उपप्राचार्य तथा भूगोल विभाग प्रमुख प्रा. विश्वनाथ देविदास पाटील (प्रा.व्ही.डी.पाटील) यांना नुकतीच नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा. पाटील यांनी “स्पेशिओ-टेम्पोरल ग्रोथ अँड डिस्ट्रिब्युशन ऑफ अर्बन सेटलमेंट इन जलगाव डिस्ट्रिक्ट” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. या संशोधनासाठी त्यांना नांदेड विद्यापीठाच्या मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता प्रो. डॉ. पराग खडके यांनी मार्गदर्शन केले, तर प्रा. डॉ. सुरेश शेलार (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, भूगोल अभ्यास मंडळाचे चेअरमन) यांनी बाह्य परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
प्रा. पाटील यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व अमळनेर तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, उपाध्यक्ष देविदास साळुंखे, सचिव देविदास पाटील, संचालक वाय. के. पाटील, डॉ. सुरेश साळुंखे, दिनेश साळुंखे, साहेबराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम साळुंखे, प्राचार्य डॉ. वसंत देसले, प्रशासकीय अधिकारी के. व्ही. पाटील, शिखर बँकेचे अधिकारी संजय पाटील, ज्ञानेश्वर सोमवंशी, पुरुषोत्तम देवरे, प्रा.डॉ.बी.एस. पाटील, प्रा.डॉ.एस.बी. पाटील, अमळनेर पंचायत समितीचे लिपिक अनिल पाटील, ब.पा. महाविद्यालय किनवट येथील प्रा.डॉ. अनिल नवल पाटील, पर्यवेक्षक प्रा. संजय बागुल, निलेश साळुंखे, प्रा. अनिल महाले, प्रा. विजय शिंदे, प्रा. अशोक भामरे, प्रा. प्रमोद पाटील, प्रा. डॉ. संजय महाजन, प्रा. डॉ. संजय पाटील, नरेंद्र पाटील, संजय खैरनार, राजेश सैंदाने, भटू पाटील, नथु पवार, माजी पोलीस पाटील पंढरीनाथ पाटील, भुषण पाटील, जयेश सोमवंशी, प्रफुल्ल देवरे आणि गोवर्धनचे लोकनियुक्त सरपंच पंकज पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
प्रा. पाटील हे गोवर्धन येथील माजी सरपंच व ग्रामविकास शिक्षण मंडळाचे सचिव देविदास बारकू पाटील यांचे सुपुत्र होत. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.