जळगाव प्रतिनिधी । स्वच्छ भारत समर इंटर्नशिप प्रोग्राम 2019 करीता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या मनुष्य बळ विकास मंत्रालय व केंद्र शासनाच्या युवा व खेळ मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने 50 तासांचा स्वच्छ भारत समर इंटर्नशिप प्रोग्राम 2019 चे आयोजन करण्यात आले आहे. याचा कालावधी 10 जून 2019 ते 31 जुलौ, 2019 असा आहे. या प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी http://sbm.gov.in/SBSI2019 या संकेतस्थळावर (पोर्टल) विद्याथ्र्यांनी ई-पध्दतीने नोंदणी (ऑनलाईन रजिस्ट्रेशन) करावयाचे आहे. या प्रोग्राम करीता ग्रामीण भागात प्ल्ॉस्टिकमुक्त वातावरण, त्याची खतनिर्मिती आणि व्यवस्थापन ही थीम असून यशस्वी विद्यार्थ्यांना शासनाकडून पारितोषिक दिले जाणार आहे अधिकाधिक विद्याथ्र्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती nssmantralaya@gmail.com, nssrcpune@gmail.com आणि एक प्रत nss@nmu.ac.in या ई-पत्त्यावर पाठवावी असे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे यांनी कळविले आहे.