पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंजाबमधील शेतकरी आंदोलन व हमीभावासाठी होत असलेल्या आंदोलनाला केंद्र सरकारने सरदार ढल्लेवाल यांनी उपोषण सोडावे यासाठी निवेदन दिले. एक वर्ष होत आले असून पंजाब व हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
शेती व्यवसायातील अनिश्चितता व असुरक्षितता पाहता या शेतकरी संघटनांनी उत्पन्नाची हमी मागितली आहे. त्यासाठी कोणीही किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करू नये असा कायदा करण्यात यावा, शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करावे, भूमी अधिग्रहण कायदा व इतर काही मागणी आहेत.
सर्व मागण्या केंद्र सरकारने मान्य करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही मागणी जळगाव जिल्हा शेतकरी संघटना तसेच स्वभापच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुकाध्यक्ष भिकनराव पाटील, उपाध्यक्ष अनिल पाटील, स्वभापचे अरविंद बोरसे, संभाजी पाटील, संजय पाटील, दिलीप पाटील, विकास शिंदे, भाऊसाहेब पाटील व इतर शेतकरी उपस्थित होते.