जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत मोदी ३.० सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प गरीब,युवक,अन्नदाता आणि नारीशक्तीला डोळयासमोर ठेवून भरीव तरतुदीसह सादर करत आहेत. अर्थमंत्री म्हणून आपल्या आठव्या अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांनी देशातील कोट्यवधी जनतेला मोठी भेट दिली आहे.
अर्थमंत्र्यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेची व्याप्ती वाढवली आहे.यासह आता किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे.याचबरोबर कृषी क्षैत्रासाठी मदत केली. तसेच मध्यम मध्यमवर्गीयांना करा मध्ये सवतल देत मोठा दिलासा दिला आहे. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये देखील वाढ करून औषधीच्या किमंती कमी करत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या तीन विद्यापीठांची घोषणा करण्यात आल्याने तंत्रज्ञानाच्या दृष्टीने भारत विकासाकडे वाटचाल करीत आहे.
औद्योगिक क्षैत्रासाठी देखिल मोठी घोषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने आतापर्यंत सर्वात सुंदर बजेट सादर केले आहे. अशी प्रतिक्रिया गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी दिली.