जामनेर(प्रतिनिधी)। सोयगाव येथील जिल्हा परिषद शिक्षक दिलीप पोपट पाटील सोयगाव जि.औरंगाबाद हे आज १२ मार्च २०१९ रोजी सकाळी शाळेत जातो असे सांगून सोयगाव येथून राहत्या घरातून निघाले. ते सकाळी ७ वाजेच्या सुमारास मोटर सायकली क्रमांक (एम.एच.२० सी.एस.४३१८) टीव्हीएस (अपंगासाठी असलेली) ही गाडी घेऊन शाळेत गेले. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद होता.
शाळेत न जाता परस्पर कोठेतरी निघाले. दरम्यान आज संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास जामनेरपासून जवळच असलेल्या रामवनात जवळच्या परिसरात दिलीप पाटील यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. तसेच पाटील हे आजारी असल्याचे प्राथमिक माहितीतून कळते. सोयगावच्या शिक्षकाचा म्रुत्यु जामनेर परिसरात कसा झाला किंवा त्यांचा घातपात करून जामनेर जवळ आणून टाकले तर नाही ना अशीही चर्चा नागरिक करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहेत.