Home क्राईम रेल्वे मार्गावर तरूणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपातची शक्यता !

रेल्वे मार्गावर तरूणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपातची शक्यता !

0
179

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील दिनकर नगरात राहणाऱ्या ३१ वर्षीय तरूणाचा मृतदेह जळगाव ते भादली रेल्वे मार्गावर संशयास्पद मिळून आल्याने खळबळ उडाल्याची घटना सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी प्रकरणी पहाटे ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षल प्रदीप भावसार (वय-३१) रा. दिनकर नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, हर्षल भावसार हा आपल्या कुटुंबियांसह दिनकर नगरात वास्तव्याला होता. रविवारी १६ नोव्हें रोजी सायंकाळी ७ वाजता हर्षल भावसार हा घराबाहेर गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेण्यास सुरूवात केली. सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह जळगाव ते भादली रेल्वे मार्गावर मिळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. तरुणाच्या खिशात असलेल्या पाकीट व आधारकार्डवरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली व संबंधितांना माहिती दिली. तरुणाचा मृतदेह बायपासनजीकच्या रेल्वे रुळाजवळ सापडला तर त्याची दुचाकी काशीबाई उखाजी कोल्हे शाळेनजीक आढळली. हर्षल याच्यासोबत घातपात झाला असून त्याला मारून रुळाजवळ टाकण्यात आल्याचा आरोप त्याचे मामा मयूर भावसार यांनी केला. हर्षल व त्याच्या मित्रांनी रविवारी १६ नोव्हेंबर रोजी रात्री शनिपेठेत सोबत जेवण केल्याची माहिती समोर येत आहे. त्यावेळी काही वाद झाला व त्यानंतर हर्षलचा मृतदेह सापडला. या संदर्भात जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound