भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील अयोध्या नगरात बेकायदेशीररित्या दिवशी बनावटीचा गावठी कट्टा सोबत घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला भुसावळ शहर पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.जगन धर्मा कोळी (वय-४४, रा. आयोध्या नगर भुसावळ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
भुसावळ शहर पोलिसांनी दिलेले माहिती अशी की, भुसावळ शहरातील अयोध्या नगरातील परिसरात संशयित आरोपी जगन कोळी हातात गावठी बनावटीचा कट्टा घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मिळाली. त्यानुसार त्यांनी शनिवारी १७ ऑगस्ट दुपारी ४ वाजता कारवाई करत संशयित आरोपी जगन धर्मा कोळी याला अटक केली. त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जगन धर्मा कोळी यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलिस हात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद करीत आहे.