गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयीताला अटक : एलसीबीची कारवाई

जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जामनेर शहरातील दामले प्लॉट भागामध्ये गावठी बनावटीचा पिस्तूल हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल हस्तगत केले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क कार्यालयाने शनिवारी 13 जुलै रोजी दुपारी एक वाजता दिलेल्या प्रचिती पत्रकान्वये कळविले आहे. निलेश प्रल्हाद मोरे, वय २३, रा. दामले प्लॉट, जामनेर असे संशयित आरोपीचे नाव आहे.

जामनेर शहरातील दामले प्लॉट भागामध्ये शुक्रवारी 12 जुलै रोजी रात्री आठ वाजता जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रणजीत जाधव हे पेट्रोलिंग करत असताना परिसरात संशय आरोपी निलेश मोरे हातात गावठी बनावटीचा पिस्तूल घेऊन दहशत माझे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार, पोलीस कॉन्स्टेबल कमलाकर बागुल, पोना रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, भारत पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी निलेश प्रल्हाद मोरे वय 23 राहणार दामले प्लॉट परिसर जामनेर याला अटक केली त्याच्याकडून गावठी बनावटीचा पिस्तूल जप्त केला आहे याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहे.

Protected Content