विवाहितेच्या अत्याचार प्रकरणात संशयिताला कोठडी

जळगाव प्रतिनिधी । मित्राच्या पत्नीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रमेश काकडे (रा. पिंप्राळा) याला बुधवारी न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. 

काकडे याला रामानंद नगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. व्यवसायात स्वतःच्या फायद्यासाठी पत्नीला मित्रासोबत शरीरसंबंधात भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणात सर्वात आधी पतीला अटक करण्यात आली, त्यानंतर इंदूर येथे पळालेल्या मित्राला मंगळवारी जळगावात येताच अटक करण्यात आली. आज गुरूवारी संशयित आरोपी रमेश काकडे याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

 

Protected Content