भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालयाच्या पाठीमागील शेतात एका १२ अल्पवयीन मुलाचा कापडाने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणात भुसावळ तालुका पोलिसांनी या गुन्ह्यात विधी संघर्ष 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालयाच्या मागील शेतात अनिल कैलास आव्हाड, वय-१२ रा. लोखंडी पुलाजवळ, भुसावळ या मुलाचा कापडाने गळा आवळून खून केल्याची घटना १६ जुलै रोजी उघडकीला आली होती. याप्रकरणी भुसावळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्त विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना या खुनाचा उलगडा जळगाव तालुका पोलिसांनी केला असून या घटनेतील विधी संघर्षित १७ वर्षीय बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली आहे.