जामनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यात पडलेल्या दरोड्यातील माहिती देणाऱ्या संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारोळा शहरातील जिनिंग येथून अटक करण्यात आली आहे. त्याला पुढील कार्यवाहीसाठी जामनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांना जामनेर पोलीस स्टेशन येथील गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश देण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तपासात पो.कॉं सचिन महाजन यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी गोविंद तुकाराम आर्य (वय २८, रा. चाटली, ता. निवाली, जि. बड़वाणी, मध्यप्रदेश) हा संशयित निष्पन्न केला.
गोपनीय माहितीनुसार याला पारोळा येथील ओम नम: शिवाय जिनींगमध्ये असल्याची बातमी मिळाल्याने तात्काळ जागेवर जाऊन संशयित आरोपी गोंविद आर्यला पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याला दरोड्याच्या गुन्ह्याबाबत विचारले असता त्याने कबुली दिली आहे. पुढील कारवाई करिता जामनेर पोलीस स्टेशन येथे जामनेर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.