जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरातून पुतणी सोबत पायी जात असलल्या काकाच्याखिश्यातील रोख रक्कम जबरीने हिसकवीत पसार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. गुन्ह्यातील मुसेफ शेख मुल्तानी रा. गेंदालाल मील याला शहर पोलिसांनी अटक केली.
चाळीसगाव येथील मिलींदनगरातील रहिवासी दिलीप भीमराव जाधव (वय-४७) हे पुतणी सोनी सुरेश इंगळे यांच्यासह शहरातील गेंदालाल मिली परिसरातून शुक्रवार २ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पायी जात होते. त्याचवेळी मुसेफ मुलतानी रा. गेंदालाल मिल आणि एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ येवून दिलीप जाधव यांच्या शर्टाच्या खिश्यातील १ हजार २०० रूपये जबरी काढून घेत दोघांना शिवीगाळ करून घटनास्थळहून पसार झाले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरूध्द तक्रार दिली. दिलीप जाधव यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सकाळी १० वाजता शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अक्रम शेख, तेजस मराठे, भास्कर ठाकरे, रतन गिते यांनी संशयित आरोपी मुसेफ मुलतानी रा. गेंदालाल मिल याला गेंदालाल मील परिसरातून अटक केली. त्याच्याकडून संपुर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.