अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताला अटक; चोपडा पोलीसांची कारवाई

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून खून करणाऱ्या संशयित आरोपीला पोलीसांनी अवघ्या काही तासातच अटक केली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश पूना बारेला (वय-२२) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

चोपडा तालुक्यातील विरवाडा येथील एका शेतमजुराच्या चार अल्पवयीन मुली स्वतः च्या शेतातून काम करून घराकडे परतत असताना १३ वर्षीय मुलीला नराधमाने शेतात ओढून नेत अमानुषपणे अत्याचार करून चेहरा दगडाने ठेचून खून केल्याची हृदयद्रावक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.संशयित आरोपी मुकेश पुन्या बारेला मुळचा रा.बलवाडी ता.वरला जि.बडवानी सध्या रा.पाटचारीजवळ चोपडा यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत एलसीबी पथक, डॉग स्कॉड पथक , फॉरेन्सिक पथक, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक चोपडा विभागाचे पोलीस अधिकारी, घटना स्थळी दाखल होऊन तपासचक्रे फिरवत होती. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह चोपडा उप जिल्हा रुग्णालयाकडे शव विच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. त्यानंतर आज सकाळी 8 वाजेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत परिसरातून प्राप्त माहिती अशी की,काल ७ सप्टेंबर रोजी रोजी सायंकाळच्या ४ ते ५ वाजेच्या सुमारास १३ वर्षीय मुलगी ही आपल्या इतर तीन बहिणीसोबत वास्तव्याला होती. चार बहिणी स्वतःच्या शेतातून काम करून घराकडे परत येत असताना त्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलींस संशयित आरोपी मुकेश पुन्या बारेला याने वाघ्या नाल्याकडे पकडून ओढून नेले. यावेळी तिच्या इतर तिघे बहिणी घाबरून गावाकडे धाव घेऊन गावात पोहचल्या अन् घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर गावातील ४०/५० लोक जमून शेत परिसरात तिचा शोध घेत असतांना सदरील मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत, चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत विरवाडे शेत शिवारातील भगवान गोटू पाटील यांच्या कपाशीचे पीकात आढळून आला. ही वार्ता वाऱ्यासारखी गावात येऊन धडकताच गावावर शोककळा पसरली. याबाबत पोलिस सुत्रांना माहिती मिळताच फौज फाट्यासह घटना स्थळी दाखल झाले काही तासांतच संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून मृतदेह चोपडा उप जिल्हा रुग्णालयाकडे शव विच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
घटना स्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक माळेश्वर रेड्डी अप्पर, चाळीसगाव परिमंडळ पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हा अन्वेषण
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड ,पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पीएसआय एकनाथ भिसे ,पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वालटे यांनी भेट दिली. याप्रकरणी हामा सुमला बारेला याच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात आरोपी मुकेश पुन्या बारेला याच्या विरुद्ध भाग-५ सीसीटीव्ही ४५४ 2024 भारतीय न्याय संहिता कलम 65, 66 ,103 पोस्को 4 ,8, 12 प्रमाणे पुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास पोनि कावेरी कमलाकर हे करीत आहे.

Protected Content