Home क्राईम पहूरजवळ जुगार अड्ड्यावर छापा; नऊ जणांना अटक

पहूरजवळ जुगार अड्ड्यावर छापा; नऊ जणांना अटक


पहूर, ता. जामनेर (वार्ताहर) येथून जवळच असलेल्या हिवरखेडा रोडलगत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकून नऊ जणांना अटक केली आहे. तसेच पाच हजार पन्नास रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवरखेडा रोडलगत शेतात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, सहाय्यक फौजदार अनिल अहिरे, शशिकांत पाटील, अनिल देवरे, नवल हटकर, किरण शिंपी यांनी बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना आढळलेल्या केतन प्रकाश जाधव, सागर रामराव पाटील, देवेंद्र सुभाष भोई, ज्ञानेश्वर मोतीलाल चौधरी, विनोद अशोक चौधरी, अरीफ मुखतार तडवी, महेश बाळकृष्ण महालपूरे, अमोल अरूण पाटील, सतीश कडू पांढरे यांना ताब्यात घेऊन पो.काँ. साहेबराव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई जुगार अँक्ट १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून वरील सर्वांना अटक करून सुटका करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound