Home Cities जळगाव सुरेशदादा जैन यांच्या आगमनाची जय्यत तयारी : होणार जोरदारस्वागत !

सुरेशदादा जैन यांच्या आगमनाची जय्यत तयारी : होणार जोरदारस्वागत !

0
31

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी आमदार सुरेशदादा जैन हे घरकूल प्रकरणात नियमीत जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच आज येत असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

घरकूल गैरव्यवहार प्रकरणात माजी आमदार सुरेशदादा जैन यांना आधीच जामीन मिळाला असला तरी त्यांना मुंबई न सोडण्याची अट टाकण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना या प्रकरणात नियमीत जामीन मिळाला. अर्थात, यामुळे आता ते कुठेही जाऊ शकतात. या पार्श्‍वभूमिवर, ते आज जळगावात येत आहेत. राजधानी एक्सप्रेसने आज रात्री नऊच्या सुमारास त्यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होणार आहे.

सुरेेशदादा जैन हे प्रदीर्घ काळानंतर शहरात येत असल्याने चाहत्यांनी त्यांच्या जोरदार स्वागताची तयारी केली आहे. ते राजकारणात सक्रीय होणार की नाही ? याबाबत अद्याप स्पष्टता दिसून आलेली नाही. तथापि, सध्याच्या राजकीय कोलाहलाच्या पार्श्‍वभूमीवर जळगावातील त्यांचे आगमन हे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरणारे आहे.


Protected Content

Play sound