सुरेशदादांची प्रकृती धोक्याबाहेर, अफवा पसरवू नये – लढ्ढा (व्हिडीओ)

515b2a00 35e4 4b60 9146 da4a64d97353

जळगाव, प्रतिनिधी | शिवसेना नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या प्रकृतीविषयी नुकतीच अफवा निर्माण झाली होती, पण त्यांची प्रकृती उपचारानंतर आता धोक्याबाहेर आहे, अशी माहिती माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी आज (दि.२५) ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना दिली.

 

ते म्हणाले की, त्यांची प्रकृती दोन दिवसांपूर्वी बिघडली होती, त्यांना त्यानंतर तातडीने उपचारांसाठी जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांच्याविषयी अशा अफवा पसरवण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्यामुळे कुणीही असे खोटे मेसेज पसरवू नये, असेही ते म्हणाले.

 

 

Protected Content