Home Cities धरणगाव धरणगाव विकासो चेअमनपदी सुरेश चौधरी यांची बिनविरोध निवड

धरणगाव विकासो चेअमनपदी सुरेश चौधरी यांची बिनविरोध निवड


1d85dc28 09b5 4c10 9905 8bfd0fd56d0c

धरणगाव (प्रतिनिधी) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअमनपदी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आणि तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सिताराम चौधरी यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर व्हा.चेअमनपदी सुकदेव काशिराम पाटील यांची निवड झाली आहे.

 

धरणगाव विविध कार्यकारी सोसायटीमध्ये सुरेश चौधरी गेल्या २० वर्षांपासून संचालक असून यापूर्वी त्यांनी २००३-०४ मध्ये विविध कार्यकारी सोसयटीचे चेअरमन म्हणून काम पाहिले आहे.त्यांनी धरणगाव नगरपालिकेत सहा वेळा नगरसेवक तर दोन वेळा नगराध्यक्षपद भूषवले आहे. तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीत ते गेल्या २० वर्षांपासून संचालक आहेत. तसेच गेल्या २० वर्षांपासून गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये चेअरमनही आहेत.

या निवडीप्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून आर.एस. पाटील यांनी काम बघितले. यावेळी सचिव नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, म.नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन, मधुकर रोकडे, विठोबा नामदेव माळी, रावा धनलाल माळी, ज्ञानेश्वर रावा महाजन, उमेश जानकीराम महाजन, विजय धनलाल महाजन, जीवन बयास, शैलेश चंदेल, कृपाराम महाजन, शरद माळी, जयसिंग मराठे, सम्राट धनगर, पंढरीनाथ माळी, सोमनाथ माळी, वासुदेव महाजन, देविदास महाजन, जगन्नाथ महाजन, मिलिंद पवार, पांडुरंग महाजन, देवलाल महाजन आणि सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते, सगळ्यांनी निवडीबद्दल त्यांचे अभिनन्दन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound