सुरवाडा खु|| येथे जागतिक महिला दिन साजरा

बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सुरवाडा खु|| ग्रामपंचायत येथे तालुका कृषी विभाग मार्फत नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

हा कार्यक्रम दि. ८ मार्च रोजी वेळ दुपारी ०४:०० वाजता साजरा करण्यात आला. या ठिकाणी कार्यक्रमाचे मार्गदर्शक सि .जे .पाडवी, तालुका कृषी अधिकारी तसेच लांडगे, पंकज माळी हे होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाडवी यांनी महिला दिनानिमित्त महिलेने १८५७ साला पासून केलेले संघर्ष बद्दल माहिती दिली तसेच लांडगे यांनी कृषी विभागात असलेल्या योजनेबाबत माहिती सांगितली व पंकज माळी यांनी आभार व्यक्त केले. या ठिकाणी महिला बचत गट सुरवाडा खु गावाचे महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content