जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । सुप्रीम कॉलनीतील पांडे किराणाजवळ बचत गटाचे पैसे वेळेवर न दिल्याने महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी १४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुप्रीम कॉलनी परिसरातील पांडे किरणाजवळ परविन सलीम पटेल (वय-२५) या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान बचत गटाचे पैसे वेळेवर न दिल्याने परवीन पटेल यांना शंकर कंजर, सुष्मिता कंजर, शोभा कंजर रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव यांनी परविन पटेल यांना चपटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली तसेच जीवेठार मानण्याची धमकी दिली.
या संदर्भात शनिवारी १४ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शंकर कंजर, सुष्मिता कंजर, शोभा कांजर रा. सुप्रीम कॉलनी जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहे.