यावल येथील उपोषणाला मविआचा रास्ता रोको करत पाठींबा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील सावखेडासिम येथील ग्रामपंचायतीस प्राप्त सन २०२० ते २२ पर्यंतच्या  विविध निधी वापरातील अनियमिता  व अपहार संदर्भात गेल्या १० महिन्यापासून कारवाईची मागणी करूनही तसेच गेल्या पाच दिवसांपासून पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील व ग्रामस्थांचे यावल पंचायत समितीच्या कार्यालया समोर उपोषण सुरू आहे. परंतू शासनाने याकडे कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने भुसावळ टी पॉइंटवर रोखत सुमारे एक तास आंदोलन केले आहे.

 

यावल तालुक्यातील सावखेडा ग्रामपंचायत अपहार प्रकरणाच्या संबंधितांवर कारवाईसाठी गेल्या १० महिन्यापासून पाठपुरावा करूनही तसेच गेल्या ५ दिवसापासून पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील व ग्रामस्थ उपोषण करीत आहेत. मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. उपोषणाची प्रकृती खालावली आहे . शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी  सकाळी महाविकास आघाडीचे वतीने येथील भुसावळ टी पॉइंटवर सुमारे १ तास रास्ता रोको करत धरणे आंदोलने  केले आहे. गुरुवारी या संदर्भात तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती यांना निवेदनही दिले आहे. त

 

अखेर पो.नि.राकेश माणगावकर यांचे मध्यस्थीने प्रशासनाची कारवाई सुरू असल्याचे सांगून आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते,युवक राष्ट्रवादीचे पवन पाटील, आबिद कच्छी, काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष अनिल जंजाळे ,काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान , काँग्रेस सोशल मिडियाचे प्रमुख अभय महाजन , उमेश जावळे ,राहुल गजरे,राकेश करांडे,अशफाक शाह, शिवसेना उबाठाचे शरद कोळी,संतोष धोबी ,पप्पू जोशी यांचे सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्याचे पहायला मिळाले.

Protected Content