अमळनेर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना परीक्षा केंद्रावर आणू नये. दहावीच्या परीक्षा केंद्रात पर्यवेक्षकांनी आपल्या वेळेवर यावे. परीक्षा शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी सहकार्य करावे, असे सांगत परीक्षा संदर्भातल्या महत्वाच्या सूचना आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उपकेंद्र संचालक पी ए पाटील यांनी दिल्यात. ते इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा संदर्भात पर्यवेक्षकांची सहविचार सभेत बोलत होते.
१ मार्च २०१९ पासून सुरु होणारे इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा संदर्भात पर्यवेक्षकांची सहविचार सभा नुकतीच अमळगाव केंद्रावर संपन्न झाली. अध्यक्षस्थानी केंद्र संचालक निंभोरा हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.एस चौधरी होते. व्यासपीठावर अमळगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उपकेंद्र संचालक पी ए पाटील प्रा.के एस विंचुरकर प्रा.श्याम पाटील, मुख्याध्यापक अनिल महाजन एस व्हि. पाटील, बी.एस सैदाणे होते. सविचार सभेचे प्रस्ताविक प्रा. शाम पाटील यांनी केले. अध्यक्षीय भाषणात निंभोरा हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.एस. चौधरी म्हणाले की, परिक्षा केंद्रा बाहेरील उनाड विद्यार्थ्यांना केंद्राच्या आसपास फिरकू देऊ नये.परीक्षा शांततापूर्ण वातावरणात पार पाडणे केंद्रातील सर्व सर्व कर्मचाऱ्यांचे नैतिक कर्तव्य आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. असे सांगितले.यावेळी अमळगाव, देवगाव,देवळी, गांधली पिळोदा, पिंगळवाडे निभोंरा,दोधवद,पिंपळी, हायस्कूलचे शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन के .एस .विंचुरकर यांनी मानले.