जळगाव (प्रतिनिधी ) येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव जिल्हा शाखेची कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. कार्याध्यक्षपदी पुन्हा एकदा प्रा. डी.एस. कट्यारे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
जळगाव शाखेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निरीक्षक डॉ. ठकसेन गोराणे (नाशिक) यांनी याबाबत घोषणा केली. कार्यकरिणीमध्ये अध्यक्ष अनिल पाटील(जळगाव), उपाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. बी. एन.पाटील(पाचोरा), डॉ.अजय शास्त्री, जळगाव यांची निवड झालेली आहे. कार्यकारणीत प्रधान सचिव म्हणून रविंद्र चौधरी(पाचोरा), अशोक तायडे(जामनेर), सुनिल वाघमोडे(अमळनेर), मोहन मेढे (मुक्ताईनगर), बुवाबाजी संघर्ष – अरुण दामोदर(भुसावळ), विविध उपक्रम – शिरीष चौधरी(जळगाव), वैज्ञानिक जाणीव प्रकल्प – महेंद्र निवृत्तीनाथ (बोदवड), वार्तापत्र व्यवस्थापन – आर.एस.चौधरी (जळगाव), प्रकाशन वितरण डॉ.अयुब पिंजारी(चोपडा), प्रशिक्षण विभाग – ऍड. राजेश रायमळे (रावेर), महिला सहभाग – हेमांगी टोकेकर(जळगाव), युवा सहभाग – खुशाल जाधव(चाळीसगाव), मानस मित्र आरोग्य प्रकल्प – प्रकाश पाटील(रावेर), विज्ञानबोध वाहिनी – आर.बी.पाटील (जळगाव), सोशल मीडिया व्यवस्थापन – प्रा. विश्वजीत चौधरी(जळगाव), सांस्कृतिक अभिव्यक्ती – डी.आर. कोतकर(पाचोरा), कायदेविषयक व्यवस्थापन – ऍड. भरत गुजर(जळगाव), यांची निवड झालेली आहे. आगामी दोन वर्षांमध्ये समाजाभिमुख उपक्रम कृतीत आणण्याचा संकल्प या कार्यकारिणीने केला आहे. कार्यकारणीचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे.