धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव येथे अखिल भारतीय लाड शाखीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनील तात्या नेरकर यांची नुकतीच निवड झाली असून, या गौरवाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. श्री व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात वाणी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कार समारंभात सुनील नेरकर यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये सौ. स्मिता ताई पाटकर (राष्ट्रीय कार्यक्रम सदस्य, महिला आघाडी), सौ. मिनाक्षी ताई चितोडकर (प्रदेश सहकार्यवाह, महिला आघाडी), लाड शाखीय वाणी समाज मंडळ धरणगावचे अध्यक्ष विलास येवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर वाणी, सचिव सुधाकर येवले, खजिनदार व अर्बन बँकेचे चेअरमन प्रवीण कुडे, भाजपचे माजी नगरसेवक ललित येवले, श्री व्यंकटेश नागरी पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत केले, व्हा. चेअरमन अजय वाणी यांचा समावेश होता.

कार्यक्रमात संचालक प्रवीण येवले, चंद्रशेखर कुडे, भगवंत येवले, सौ. सविता मालपुरे, सौ. वैष्णवी येवले, नितीन अमृतकर, प्रकाश वाणी यांच्यासह वाणी समाजाचे अनेक समाजबांधव व पतसंस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॅनेजर किरण वाणी यांनी तर प्रास्ताविक संचालक चंद्रशेखर वाणी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पतसंस्थेच्या सर्व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
सुनील तात्या नेरकर यांच्या नेतृत्वाखाली वाणी समाजाच्या प्रबोधनाच्या कार्यास नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा या वेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेल्याने धरणगाव शहरात वाणी समाजात विशेष आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या सत्कार सोहळ्याने धरणगावात सामाजिक ऐक्याचे आणि सन्मानाचे सुंदर उदाहरण साकारले. भविष्यातही अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना समाजाकडून मान-सन्मान मिळावा, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.



