जळगाव प्रतिनिधी । मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट, नवी दिल्ली जळगाव जिल्हाध्यक्षपदी सुनिल नंन्नवरे तर डॉ. रूचिता धनगर यांची जळगाव जिल्हा महीला अध्यक्ष म्हणून संस्थापक व राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिनेश गुप्ता यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच नियुक्ती केली आहे. त्यांना महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल नंन्नवरे यांनी नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
सुनिल नंन्नवरे यांना समाजाचे कामासोबतच सामाजिक कार्याची आवड आहे गेल्या सात वर्षांपासून समाजात जनजागृतीपर अभियान राबवित आहेत तसेच ते अखिल भारतीय कोळी समाजाचे कार्यकर्ता आहेत समाजात नेहमी सामाजिक विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करून गरजवंताना सहकार्य करत असतात,त्यांचेकडे आदीवासी कोळी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे तसेच सूर्या फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना उत्तर जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
डॉ. रूचिता छगन धनगर या उच्च शिक्षित असून नेहमी गरीब व असाह्य लोकांना मदत करतात,गरीब घरातील मुलांना परिस्थिती अभावी शिक्षण घेता येत नाही अश्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य ते करतात,समाजकार्य करण्याची त्यांना प्रचंड आवड आहे व नेहमी त्या समाज कार्यात अग्रेसर असतात त्यांची यावेळी महाराष्ट्र प्रदेश आई.टी.सेल सचिव डॉ. राजनराम जैसवाल, राष्ट्रीय प्रभारी संजय मेवालाल गुप्ता,प्रदेश सचिव अनिल नंन्नवरे, जिल्हा युवक अध्यक्ष धनराज साळूंके, जिल्हा उपाध्यक्ष योगेश बाविस्कर, राजेंद्र चौधरी, सचिव ज्ञानेश्वर पाटील, जळगाव महानगर प्रमुख किरण भावसार,जिल्हा युवक उपाध्यक्ष उमेश उर्फ राहूल निकुंभ व मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते.
सुनिलभाऊ नंन्नवरे यांचे निवडीचे परेशभाई कोळी, राज्य युवा अध्यक्ष, अखिल भारतीय कोळी समाज, अॅड.शरदचंद्र जाधव, मुख्य समन्वयक, आदीवासी कोळी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, अॅड. पी.सी.चौधरी, उत्तर महाराष्ट्र विभागीय विधी सलाहकार, मंगला सोनवणे, वर्षाताई बाविस्कर, जिल्हा महीला सल्लागार, अॅड.शोभाताई खैरनार, उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा धुळे जिल्हा अध्यक्ष हिरालाल वाकडे, बांभोरी(प्र.चां.)उपसपंच ग भिकनदादा नंन्नवरे, गोपालशेठ नंन्नवरे, रवीशेठ नंन्नवरे, अनिल शेठ नंन्नवरे, अॅड.विशाल घोडेस्वार, रोहन पराये, नंदकिशोर जगताप, आकाश पाटील आदींसह अभिनंदन केले.