रावेर प्रतिनिधी । शासनमान्य ग्राहक कल्याण फाउंडेशन संघटनेच्या रावेर तालुका उपाध्यक्षपदी केमिस्ट असोसिएशनचे माजी तालुकाध्यक्ष सुनील महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
येथील छोरिया मार्केटमध्ये झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे .महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषदचे अशासकीय सदस्य विकास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या निवडीबद्दल ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे प्रदेशाध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर, प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र तांबे ,प्रदेश कार्यवाह सतीश साकोरे, अशोक महाजन, विलास महाजन बाळू पाटील यांच्यासह नागरिकांनी अभिनंदन केले आहे. निवड झालेले सुनील महाजन येथील संजीवनी मेडिकलचे संचालक आहेत .