Home राजकीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार


मुंबई-वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत आज मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. पक्षाची धुरा आता पूर्णपणे सुनेत्रा पवार यांच्या हाती देण्यात आली असून त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. ही घोषणा पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी वरळी येथील डोममध्ये पार पडलेल्या ‘राष्ट्रीय अधिवेशन २०२६’ मध्ये केली.

प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मांडला. या प्रस्तावाला उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमताने समर्थन दिले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची अधिकृतपणे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड निश्चित झाली.

मुंबईतील वरळी डोम येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. पक्षाच्या नेतृत्वात हा बदल महत्त्वाचा मानला जात असून आगामी काळात पक्षाची दिशा आणि रणनीती ठरवण्यात सुनेत्रा पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

दरम्यान, पार्थ पवार यांच्याकडेही पक्षात मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound