मुंबई । ईडीनं नव्यानं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स पाठवून ५ जानेवारी २०२१ रोजी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाऊंटमधून जवळपास ५५ लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा पैशाचा व्यवहार नेमका कशामुळे करण्यात आला, याबाबत ईडीला माहिती हवी आहे. त्यासाठीच कडून वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, प्रवीण राऊत आणि त्यांच्या पत्नीचे यापूर्वीच जबाब नोंदवण्यात आले असून, फक्त वर्षा राऊत यांचा जबाब नोंदवणं बाकी आहे.