जळगाव (प्रतिनिधी ) जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ झालेली दिसत आहे. आठवडाभरापूर्वी कमी झालेल्या तापमानाने आज जळगाव , भुसावळ येथे ४७ अंश सेल्सिअस एवढी पातळी गाठल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाची तीव्रता मोठ्याप्रमाणात जाणवत आहे. उन्हाच्या झळांनी आता दुपारच्या वेळी घराच्या बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे.
यासोबतच जिल्ह्यात चोपडा, यावल, वरणगाव, सावदा, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, फैजपूर, येथेही ४७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर पाचोरा, पारोळा, धरणगाव, भडगाव, अमळनेर या भागातही कमाल तापमानात वाढ होऊन ४६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची आज नोंद झाली आहे. चाळीसगाव व बोदवड येथे अनुक्रमे ४२ व ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.