Home क्राईम गळफास घेऊन भुसावळातील तरूणीची आत्महत्या

गळफास घेऊन भुसावळातील तरूणीची आत्महत्या

0
29

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील भिरूड कॉलनी परिसरातील एका तरूणीने आज पहाटे आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भिरूड कॉलनीतील शारदा विनोद माळी (वय २०) या तरूणीने आज सकाळी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. तिच्या घरात कुणीही नसल्यामुळे याबाबत लवकर माहिती मिळाली नाही. तथापि, शेजारच्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस स्थानकात याची माहिती दिली. यावरून पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक बाळासाहेब ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्ता चौधरी व हवालदार अनिल चौधरी हे करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound