जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा हवेली येथील एका वृध्दाने विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील नांद्रा हवेली येथील उमराव पाटील (वय ७०) यांनी कोणते तरी विषारी द्रव प्राशन केल्याची बाब आज सकाळी उघडकीस आली. त्यांना तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, उपचार सुरू असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी जामनेर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे.