जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरुण नागसेन नगरातील सतरा वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्त्या केल्याची घटना दुपारी अडीच वाजेपुर्वी घडली. एमआयडीसी पेालिसांत अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
कुणाल अरुण सपकाळे (वय-१७) असे मयताचे नाव आहे. नागसेन नगरातील रहिवासी कुणाल अरुण सोनवणे (वय-१७) याने राहत्या घरात दुपारी अडीच वाजेपुर्वी गळफास घेत आत्महत्त्या केल्याची घटना घडली.
कुटूंबीयांना घडला प्रकार लक्षात येताच शेजारच्यांच्या मदतीने त्याला खाली उतरवुन सागर दिलीप सपकाळे याने कृणाल याला घेवुन जिल्हारुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यास मृत घोषीत केले. डॉ.प्रवीण पाटील यांच्या खबर वरुन एमआयडीसी पेालीसांत अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास अतुल पाटील करीत आहेत.