Home क्राईम विष घेवून तरूणाची आत्महत्या !

विष घेवून तरूणाची आत्महत्या !


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विषारी औषध प्राशन करून खानापूर येथील ३५ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील खानापूर येथील गोपाळ बारी (वय-३५) याने रात्री उंदीर मारण्याचे विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याचे गुरूवार ८ सप्टेंबर रोजी उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. यासंदर्भात डिगांबर बारी यांच्या खबरीवरून रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound