
चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यातील चहार्डी येथील रहिवासी धैर्यसिंग सीताराम पाटील (वय ७५ वर्ष) या वृद्धाने गावालगत असलेल्या पाणीने तुडुंब भरलेल्या खडी खदाणीच्या डोहात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज दि.२ रोजी ८.५५ वाजेच्या पूर्वी धैर्यसिंग सीताराम पाटील(७५)यांनी खदाणीच्या डोहात उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना मयतस्थितीत चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. अशी खबर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि.नं.२०/१९ आर पी सी १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.कॉ.ज्ञानेश्वर जवागे हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात १ मुलगा,३मुली,असा परिवार आहे. त्यांना बऱ्याच दिवसापासून दम्याचा त्रास होता. या आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी चर्चा गावात ग्रामस्थांमध्ये होती.