जळगाव प्रतिनिधी| नैराश्येतून विषारी औषध घेतलेल्या ममुराबाद येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याबाबत तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अविनाश रघुनाथ पाटील (वय ३० वर्ष ) ममुराबाद ता. जि. जळगाव हा शेती काम करतो. लग्न होत नसल्याच्या नैराशेतून सोमवारी दुपारी ३ वाजता तो गावात आला व काका भगवान साहेबराव पाटील यांना आपण विषारी औषध घेतल्याचे सांगितले. त्याला उपचारार्थ जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले. मयताच्या पश्चात आई शकुंतला व विवाहित बहीण असा परिवार आहे.