Home क्राईम खिरवड येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्त्या

खिरवड येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्त्या


man suicide

रावेर, प्रतिनिधी | तालुक्यातील खिरवड येथे एका तरुणाने आत्महत्त्या केल्याची घटना आज (दि.३०) सकाळी घडली.

याबाबत अधिक वृत्त असे की, खिरवड येथील रहिवासी जितेंद्र ज्ञानेश्वर गाढे (वय ३४) याने आपल्या राहत्या घरी सकाळी ६.३० च्या सुमारास छताच्या पत्र्याला लावलेल्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. गावातील शांताराम रामु गाढे यांनी दिलेल्या खबरीवरुन याबाबत रावेर तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. कॉ. जितेंद्र नारेकर करीत आहेत.


Protected Content

Play sound