Home क्राईम गळफास घेत तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

गळफास घेत तरूण शेतकऱ्याची आत्महत्या


32647912 this is a vector illustration of hanged man silhouette
 

अहमदनगर (वृत्तसंस्था) पारनेर तालुक्यातील पळशी येथील अण्णासाहेब हरिभाउ गागरे (वय ३२) या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही व्यक्तींची नावे लिहिलेले असल्यामुळे पोलिसांनी त्यादिशेने तपास सुरु केला आहे.

 

शनिवारी सकाळी अण्णासाहेब झोपेतून उठले नाहीत म्हणून घराची खिडकी उघडून डोकावले असता त्यांनी पत्र्याच्या छताच्या पाईपला दोरीच्या मदतीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून अण्णासाहेब यांचा मृतदेह खाली उतरवला. दरम्यान अण्णासाहेब यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षराची पडताळणी करून त्यातील मजकुराप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे साहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले. साकूर तालुका संगमनेर येथील विहीर ठेकेदार तसेच एक ट्रक ड्रायव्हर अण्णासाहेब यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.


Protected Content

Play sound