
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कुसुंबा गावात राहणाऱ्या एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. किशोर पुना महाजन (वय 24) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत किशोर हा मूळ धरणगाव येथील मोठा माळीवाडा भागातील रहिवाशी होता.
किशोर पुना महाजन याने आज शुक्रवार रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. किशोर हा अविवाहित होता. नुकताच तो धरणगाव येथून रायपुर कुसुंबा परिसरात राहावयास आला होता. एका खाजगी कंपनीत तो काम करीत असल्याचे कळते. किशोरने गळफास घेतल्याचे दृश्य बघून त्याच्या आईला मोठा धक्का बसला आहे. नागरिकांनी किशोरला खाली उतरवले. परंतु तोपर्यंत तो मयत झालेला होता. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, किशोरने आत्महत्या का केली? याबाबतचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.