Home क्राईम जळगावात वृध्दाची गळफास घेवून आत्महत्या

जळगावात वृध्दाची गळफास घेवून आत्महत्या


3suicide 163

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शनिपेठ परिसरातील कांचन नगर जवळील दर्ग्याजवळ राहणाऱ्या एका ७५ वर्षीय वृध्दाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली. दरम्यान, वृद्धाच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.

 

या संदर्भात अधिक असे की, शहरातील कांचननगर दर्ग्याजवळ सागर सुभाष परदेशी हे पत्नी,वडील तसेच परिवारासह वास्तव्यास आहेत. एका टेन्ट हाऊसच्या दुकानावर ते कामाला आहेत. शुक्रवारी रात्री नवरा सागर परदेशी हे मागच्या खोलीत तर वडील सुभाष फुलसिंग परदेशी (वय ७५) हे मधल्या खोलीत झोपले होते. रात्री तीन वाजेच्या सुमारास सागर हे पांघरून घेण्यासाठी मधल्या खोलीत गेले असता, त्यांना वडील सुभाष यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी लागलीच आरडा-ओरडा करायला सुरुवात करत एकच हंबरडा फोडला. रहिवाशांनी परदेशी यांचे घर गाठले व शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक श्रीधर गुट्टे, गुन्हे शोध पथकातील दिनेशसिंग पाटील, संदीप पाटील यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी मृतदेह उतरवून रुग्णालयात हलविला. वैद्यकीय अधिकारी डॉ. अहिरे यांनी सुभाष परदेशी यांना मृत घोषित केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अहिरे यांच्या खबरीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास संदीप पाटील करीत आहेत. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound