किनगाव येथील मजूराची गळफास घेवून आत्महत्या; तीन दिवसांत तिसरी घटना

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील शेजमजूराने आज दुपारी राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील किनगाव येथील शेतमजूर राजु रामसिंग कोळी (वय-४७) हे मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. आज गुरूवारी १४ ऑक्टोबर रोजी राजू कोळी यांची पत्नी शेतात कामाला गेल्या होत्या. घरात कुणीही नसल्याने घर बंद करून छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. मयताचा मोठा भाऊ अशोक कोळी यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मागील तीन दिवसात किनगाव गावातील एकाच गल्लीतील ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Protected Content