जळगाव प्रतिनिधी। घरात कोणीही नसतांना एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , गणेश उर्फ शिवा धर्मराज मोरे (वय ४०) रा. हरिविठ्ठल नगर हे गेल्या अनेक महिन्यांपासून सेंटिंग काम करत होता. दरम्यान त्यांना दारूचे व्यसन होते. घरात कोणीही नसतांना ओढणीच्या सहाय्याने हाताला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून दारूचे व्यसन असल्याने आत्महत्या केली असावी असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई, दोन भाऊ आणि एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.